७६ व्या राष्ट्रीय चित्रपट बाल पुरस्कारविजेता ‘कस्तुरी’ हा चित्रपट प्रेक्षकांना पर्यंत आणण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील, नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप सारखे मान्यवर पुढे आले आहेत. नुकत्याच सोशल मीडिया वर या मान्यवरांनी आपण हा चित्रपट प्रस्तुत करत आहोत या संबंधात पोस्ट केली आहे. अत्यंत नाममात्र बजेट मध्ये तयार केलेल्या चित्रपटाच्या दृष्टीने हि महत्वाची गोष्ट आहे.
आपण जे जगलो जे पाहिलं जे सभोवताली घडलं ते पडद्यावर मांडायला हवं अशी मनात इच्छा घेऊन, इंजिनिअरिंग पूर्ण करून पडद्यावर साध्या पण मनाला भावणाऱ्या पद्धतीने कथानक मांडणारे मराठवाड्यातील बार्शी मधील लेखक -दिग्दर्शक विनोद कांबळे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण बार्शी मध्ये झाले आहे. दिग्दर्शक विनोद कांबळे यांनी याआधी अनेक लघुपट केले आहेत.
अभिनयात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. कला दिग्दर्शक अतुल लोखंडे, संकलक श्रीकांत चौधरी, कॅमेरामन मनोज काकडे, ध्वनी शोएब मानेरी, बॅकग्राउंड म्युजिक जयभीम शिंदे, कॉस्च्युम साठी शिवाजी करडे, मेकअप साठी सुरेश कुंभार, कार्यकारी निर्माता म्हणून अभय चव्हाण, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संजय मुंनेश्वर, मार्केटिंग आणि विरतण राजन सिंघ यांनी केले आहे.
बातमीदार - अनिकेत साळुंके
मिलेनिअल मराठी

